राळेगण सिद्दीच्या सरपंचपदी लाभेश औटी बिनविरोध .

राळेगण सिद्धीचे सरपंच डॉ. धंनजय पोटे यांनी यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी शुक्रवारी  निवड प्रक्रिया झाली . निवडीसाठी मंडलाधिकारी आर आर कोळी यांचा उपस्थित ग्रामपंचालय कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती . यावेळी लाभेश औटी यांची  सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली . राळेगण सिद्धी सह परिसराला विजेचा बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस राळेगणसिद्धीचा नवनिर्वाचित सरपंच लाभेश औटी यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केला . लाभेश औटी हे राळेगणसिद्धीचे दिवंगत सरपंच गणपतराव औटी यांचे ते चिरंजिव आहेत . गणपतराव औटी हे अण्णा हजारेंचे  अत्यंत विश्वासू सहकारी  होते .


या वेळी सरपंच पदासाठी लाभेश औटी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मंडलाधिकरी आर आर कोळी यांनी जाहीर केले . या निवडीसाठी तलाठी अशोक डोळस ,ग्रामसेवक वैशाली भगत , भाऊसाहेब पोटघन आदींनी मदत केली . यावेळी उपसरपंच अनिल मापारी ,माजी सरपंच डॉ. धनंजय पोटे , जयसिंग मापारी , मंगल मापारी , ग्रामपंचायत सदस्य सुनीता गाजरे,स्नेहल फटांगडे ,मंगल उगले ,मंगल पठारे , आदी उपस्थित होते . निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच लाभेश  औटी यांचा समर्थकांनी जल्लोष करीत आतिषबाजी केली . यावेळी उद्योजक  सुरेश पठारे ,दादा पठारे ,सुनील हजारे ,रमेश औटी , विठ्ठल गाजरे ,  जयसिंग मापारी , किसान पठारे ,शरद मापारी , पोपट औटी , बाळासाहेब पठारे , कांतीलाल औटी , संतोष औटी ,भाऊसाहेब मापारी ,एकनाथ मापारी , शरद पठारे ,अक्षय पठारे , प्रवीण पठारे , आकाश पठारे , अरुण पठारे ,दादाभाऊ गाजरे , दादाभाऊ पठारे , किसान मापारी ,गोरख मापारी , आदी उपस्थित होते .


निर्वाचित सरपंच लाभेश औटी यापुठे अण्णांचा मार्गदर्शनाखाली सर्वाना बरोबर  घेऊन ग्रामविकासाचे कार्य करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सरपंच लाभेश औटी यांनी संपूर्ण राळेगणसिद्धी व परिसर विजेचा बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे . लवकरच अण्णांचा मार्गदर्शनाखाली २५ मेगावॅट प्रकल्प उभा करणार आहे . यापुढील काळात शेतकऱ्यांना विजेची कोणतीही समस्या जाणवणार नसल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त  केला .