राष्ट्रवादीचे कामगार जिल्हा अध्यक्षपदी गजानन भांडवलकर यांची नियुक्ती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या मान्यतेने व आमदार संग्राम जगताप जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे कामगार जिल्हा अध्यक्षपदी गजानन भांडवलकर यांची नियुक्ती करून नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करताना आमदार संग्राम जगताप समवेत शहर अध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगर श्रीगोंदा विधानसभा तालुका अध्यक्ष दादा दरेकर, वैभव महस्के, विशाल महस्के, वैभव शेवाळे, पवन कुमटकर, अमित खामकर, शेखर पंचमुख, अक्षय भिंगारदिवे, दादा शिंदे, युवराज सुपेकर, हेमराज भालसिंग, उदय महस्के, यशवंत तोडमल, अक्षय पगारे, गणेश साठे, सागर सुळसुळे, सोनू दरेकर, दिलीप कटारिया, लहू कराळे, नंदू भंडारे, शहजाद शेख, बंटी दरेकर, अभिजित भांडवलकर, सचिन आठरे, सलमान बेग, यशपाल गवळी, अशोक जगताप आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गजानन भांडवलकर म्हणाले की राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष पद असताना विद्यार्थ्यांसाठी अनेक आंदोलने मोर्चे करून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत व आत्ता पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवून राष्ट्रवादीचे कामगार जिल्हा अध्यक्षपदी मला जबाबदारी दिली आहे त्यामुळे कामगारांच्या विविध अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना व युवकांना नोकरी मेळावा मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणार असून कोरोना काळामध्ये अनेकांचे रोजगार बुडाले त्यामुळे अशा व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार व कसे नवीन रोजगार उपलब्ध करता येईल यासाठी देखील कटिबद्ध राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली तसेच या निवडीबद्दल गजानन भांडवलकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.