राष्ट्रवादी विद्यार्थी कॅाग्रेसच्या संकल्पनेतून अहमदनगर जिल्ह्यांमध्ये 3870 लोकांची रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिर.

एक पाऊल देशाच्या प्रगतीसाठी एक पाऊल जनतेच्या आरोग्यासाठी असे ब्रीद वाक्य घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या माध्यमातुन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्हा मध्ये ठिक ठिकाणी नागरिकांना मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पुर्ण जिल्हा मध्ये ३८७० जणांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रसचे पदाधिकारी उपस्थित होते या शिबीरामध्ये विषेश उपस्थिती महिला, व ज्येष्ठ नागरीकांची व युवक वर्गाची उल्लेखनिय होती. डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबीरार्थीची मोफत  रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. निरोगी आरोग्य जगण्यासाठी सतत आरोग्य तपासणी व फॅमिली डॉक्टरशी सल्ला घेणे आवश्यक असल्याचे  सांगण्यात आले. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील   नागरीकांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे म्हणून अशा प्रकारचे आरोग्य शिबीर सात्यताने आयोजित करण्यात येतील असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी आश्वासित केले. शिबीरात सर्व सहकारी आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अहमदनगर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी,  तालुका आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरांचा सहभाग विशेष उल्लेखनिय होता. स्थानिक नागरीकांचे आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी हा अनोखा उपक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश प्रभारी सनी मानकर यांचा संकल्पनेतू व रा.वि.कॅा.प्रदेशध्यक्ष सुनिल गव्हाणे ,विभागीय अध्यक्ष विद्यासागर घुगे, रा.वि.कॅा. अहमदनगर जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर यांचा मार्गदर्शना खाली घेण्यात आले सदर आरोग्य शिबिर कार्यक्रम अहमदनगर जिल्हामध्ये ठिक ठिकाणी संपूर्ण दिवसभर उत्सफुर्तपणे सुरु होऊन शिबीरमध्ये सर्वांना लाभ घेता यावा या साठी सरपंच पियुष गाजरे यांचा मोलाचा योगदान लाभले या तपासणी शिबीरात तरुणांची उपस्थिती उल्लेखनीय असून. अशाप्रकारे सकारात्मक प्रतिसाद असल्यास भविष्यातही अनेक शिबीरचे आयोजन करणार आल्याची भावना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट यांनी व्यकत केली यावेळी सरपंच काटाळवेढा पियुष गाजरे, उपसरपंच वैशाली भाईक, विलास भाईक, अजित भाईक, खंडू भाईक, दत्ता भाईक,
संदीप वाघ, शरद पवार, सबाजी गुंड, पांडुरंग गुंड, कैलास आग्रे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.