रासने नगर येथे “एस एस युनिर्व्हसल सर्विसेस” चे आमदार संग्राम जगताप यांचा हस्ते उदघाटन

आजच्या धकाधकीच्या जीवना मध्ये आपल्या घराची स्वच्छता आणि सूक्ष्म किटाणू पासून सुरक्षा , हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच बरोबर घरात असणाऱ्या मुंगी मच्छर वाळवी  किटाणू पासून संरक्षण करणे आणि घराची स्वछता ठेवणे अत्यंत गरजेचे  बनले आहे. तसेच बऱ्याच घरातील सर्वच कुटुंबीय इतर कामात व्यस्त असल्या मुळे या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. हाच मुद्दा धरून रासने नगर येथे “एस एस युनिर्व्हसल सर्विसेस” या नवीन व्यवसायाचे उदघाटन करण्यात आले.


या वेळी उपस्थित नगरचे आमदार मा.संग्राम भैय्या जगताप  यांनी  ‘या संस्थे मार्फत सर्वाना आपल्या घराची स्वछता एकदम माफक दरात करून मिळेल तसेच घराची स्वच्छता चा मोठा प्रश सुटणार आहे. तसेच सर्वाना याचा नक्कीच चांगला फायदा होईल ‘ असे मनोगत उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला नगर मनपा चे उपमहापौर मा. गणेश भोसले,  मनपा चे विरोधी पक्ष  नेते मा.नगरसेवक समपत बारस्कर , एल & टी (स्नायडर इलेक्ट्रीक इंडिया प्रा.लिमीटेडचे) प्लांट हेड श्री दिलीप आढाव ,उद्योजक सचिन ठोसर  , जेऊर उपसरपंच श्रीतेश पवार , स्नायडर इलेक्ट्रीक इंडिया कंपनीचे राजेंद्र नाईकवाडी , अमोल मुळे , विरेश छडीदार ,सारंग मुळे, अतुल मेहेर , ललित भळगट ,प्रशांत जगताप , जयंत मुळे , आनंद सिसोदिया ,मनोज मालपुरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुकेश नळे, संचालक प्रतीक जगदाळे, सौ जगदाळे, सागर नागरे यांनी सर्वांना संस्थेबद्दल माहिती दिली.