रिक्षा प्रवासात तीन लाख रूपयांची चोरी

किराणा दुकानदारांची तीन लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग दोन महिला आणि एक पुरूष चोरट्याने रिक्षा प्रवासात चोरून नेली . ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती ते कोठला बसस्टँडच्या प्रवासादरम्यान घडली . याप्रकरणी किराणा दुकानदार दिलीप नंदकिशोर बाहेती ( वय ३५ , रा . चापडगाव , ता . शेवगाव ) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . ते तीन लाख रुपयांची रोकड घेऊन अहमदनगरला आले होते . बाहेती हे मंगळवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास बाजार समिती चौकात आले . तेथे ते रिक्षा ( एमएच १६ बीसी १८७४ ) मध्ये बसले . त्यांच्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती बसला होता . रिक्षा क्लेरा ब्रुस विद्यालयाजवळ आली असता दोन महिला आणि एक पुरूष रिक्षात बसले . त्यांनी रिक्षा कोठला भागात येईपर्यंत त्यांची तीन लाख रुपये रक्कम असलेली बॅग चोरीला गेली . याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन महिला आणि एक पुरूष अशा तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा अधिक तपास फौजदार कचरे हे करीत आहेत .