रिपाईच्या महिला शहराध्यक्षपदी ज्योतीताई पवार यांची नियुक्ती

तळागाळातील शोषित व दुर्बल घटकांचे प्रश्‍न रिपाईच्या माध्यमातून सोडविले जात आहे. या घटकांनी देखील संकटकाळात त्यांच्या पाठीमागे उभे राहणार्‍या पक्षाला साथ देण्याची गरज आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या काळात जातिवाद, महागाई, शेतकर्‍यांवर अन्याय व शासकीय अनागोंदी माजली असून, या हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात लढा देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे विचाराने चालणार्‍या पक्षामागे उभे राहण्याचे आवाहन रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले.

सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई पवार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) महिला शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शहरातील नागापूर परिसरात झालेल्या रिपाईच्या कार्यक्रमात पवार यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष म्हस्के बोलत होते. यावेळी रिपाईचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष नईम शेख, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, संतोष पाडळे, अल्पसंख्यांक प्रवक्ता जमीर इनामदार, जावेद सय्यद, पप्पू डोंगरे, सचिन शिंदे, भिंगार युवक अध्यक्ष राहुल सोळंकी, इरफान शेख, निजाम शेख, मोहसीन खान, अरबाज शेख, हुसेन चौधरी, दिनेश पाडळे, दादा भाकरे, संदीप पाटोळे, विशाल भिंगारदिवे, रोहन गायकवाड, राहुल गायकवाड, भाऊ बोर्डे, राहुल पाडळे, अनिकेत पवार, आदेश पाडळे, प्रथमेश पवार, संकेत पाडळे, माया गायकवाड, प्रांजली पाडळे, सोनाली पवार, मयुरी ठोंबे, अर्चना भाकरे, ललिता ठोंबे, अनु साळवे, साखरबाई पाटोळे, शोभा मिरपगार, मंगल भाकरे, काजल साळवे, आम्रपाली साळवे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना म्हस्के म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात अन्यायाला वाचा फोडण्याचे काम रिपाई करीत आहे. यासाठी संगठन केले जात असून, गावोगावी शाखा स्थापन होणार आहे. महिलांचे संघटन करुन त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ज्योतीताई पवार उत्तमपणे कार्य करणार असल्याची भावना व्यक्त केली. सर्व समाजातील महिलांना बरोबर घेऊन व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आरपीआय कटिबध्द आहे. महिला कार्यकर्त्या पक्षाशी जोडून अनेक प्रश्‍न मार्गी लावले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.