वंचितच्या पाठपुराव्याला यश विघ्नहर्ता हॉस्पिटल वर होणार कारवाई

विघ्नहर्ता हॉस्पिटल टिळक रोड येथे कोविड चाचणी बाबत पीडित जितेंद्र कुंटे व परिवार यांची फसवणूक झाली होती.याबाबत कुंटे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांना न्याय देत नव्हते त्यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्याशी संपर्क साधून मला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मला परिवारासह आत्महत्या करण्याची वेळ या प्रशासनाने आणली आहे असे सांगितले होते यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी धीर देत विघ्नहर्ता हॉस्पिटल वर मोर्चा काढत आंदोलन केले होते यावेळी प्रशासनाने दखल घेत तसेच वंचित बहुजन आघाडी चे २३/०९/२०२१ रोजीच्या पत्रानुसार निवासी जिल्हाधिकारी तथा मुख्य  कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर श्री. उदय किसवे यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटल वर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

सौ.कुंटे या बाळंतपणासाठी विघ्नहर्ता हॉस्पिटल टिळक रोड अहमदनगर येथे दाखल केले असता सौ.कुंटे यांचा उपचार अनेक महिन्यांपासून याच हॉस्पिटल मध्ये सुरू होता अडमीट करतेवेळी हॉस्पिटल प्रशासनाच्या सांगण्यावरून कोविड-१९ टेस्ट करण्यात आली सदर टेस्ट निगेटिव्ह आलेली असताना त्यांना पॉझिटिव्ह वार्डमध्ये ठेवण्यात आले.निगेटिव्ह असताना बाळंतपणाचा अवाजवी खर्च सांगण्यात आला व त्यांची फसवणूक करण्यात आली. पिडीतानी पॉझिटिव्ह रिपोर्ट ची मागणी केली असता सदर रिपोर्टमध्ये अधिकृत लॅब टेक्निशियन कडून श्री. बोरगे आरोग्य अधिकारी मनपा अहमदनगर यांचेशी संगनमताने फेरफार केल्याचे दिसून आले.याबाबत पिडीताने तक्रार केलेली आहे.अहमदनगर महानगरपालिकेने लेखाधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली होती.संबंधित लेखाधिकारी यांच्या सदर बाबी ही लक्षात आली असून त्यांनी सदर घटनेकडे दुर्लक्ष केले असे स्पष्ट निदर्शनास आले.तसेच अहमदनगर मनपा हद्दीतील सर्व दवाखान्यांमध्ये सर्वसामान्याची कोविड-१९ च्या नावाखाली आर्थिक लूट केली जात आहे असे प्रथम दर्शनी येत असे स्पष्ट सांगितले आहे.पुढील कार्यवाही साठी मनपा आयुक्त मनपा अहमदनगर यांना आदेश देण्यात आले आहेत.