वडगावात कुऱ्हाडीने वार करून शेतकऱ्याचा खून

पाथर्डी तालुक्यात कुऱ्हाडीने वार करून एका शेतकऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना रामकृष्ण नगर वडगाव , तालुका पाथर्डी या ठिकाणी घडली . सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. भागवत मारुती गर्जे (वय ३८ रा. वडगाव )असे मृतकाचे नाव आहे . तर मिठू उर्फ भागवत भगवान बडे ( वय २५ रा. वडगाव ) असे संशयिताचे नाव आहे . गर्जे हा शेतीव्यवसाय करतो तर बडे हा त्याचा घरापासून काही अंतरावर राहतो सोमवारी रात्री गर्जे विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले असता संशयित तेथे आला . शेताला विहिरीतील पाणी घेण्यावरून दोघात वाद झाला . संशयित मिठू बडे याने डोक्यात ,छातीवर ,मांडीवर वार केले बेशुद्ध गर्जे ला विहिरीत ढकलून दिले . आणि यावेळी त्या ठिकाणावरून पोबारा केला . दरम्यान भांडणाचा आवाज अचानक बंद झाल्याने शेजाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली , त्यांना गरजेचं चपला आढळुन आल्या विहिरीचे पाणी लाल झाले होते त्यांचा शोध घेऊन मृतक गर्जे चा शव विहिरीबाहेर काढण्यात आला .  याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली , माहिती मिळताच पोलिसांचा ताफा रामकृष्ण नगर वडगाव मध्ये दाखल झाले , दरम्यान संशयित बडे हा फरार आहे .