वडारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक व शाळे उपयोगी वस्तूचे भेट.

विवो कंपनी व उर्मी सामाजिक संघटनेचा उपक्रम.

अहमदनगर (प्रतिनिधी)- विवो कंपनी व उर्मी सामाजिक संघटनेच्या वतीने भिंगार येथील वडारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शैक्षणिक व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत उद्योजक कमलेश झंवर (भिंगारवाला), जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, मा.नगरसेवक संजय चोपडा, अजित जगताप, विवो कंपनीचे एचआर मॅनेजर जयदिप मोहिते, सुरेश कदम, मनोज कुमार, प्रमोद वाघ, कमलेश वर्मा, तेजस डेव्हिड, शिवकांत चव्हाण, वडारवाडी गावचे सरपंच आरती तागडकर, शाळेचे मुख्याध्यापिका विजया वराडे, उपशिक्षिका ज्योती नेटके, संगीता आडेप, सावित्री पाटील, रामकिसन वागस्कर आदीसह विवो कंपनीचे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विवो कंपनीचे एचआर मॅनेजर जयदिप मोहिते म्हणाले की विवो कंपनी व उर्मी सामाजिक संघटनेच्या वतीने मुलांच्या उपयोगासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात आले असून वडारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रीन बोर्ड 5, फॅन 5, वॉटर फिल्टर मशीन तसेच बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण देण्यासाठी ई लर्निंग सिस्टीम देऊन तसेच वह्या पुस्तक पेन आधी साहित्य शाळेस देण्यात आले असून येणाऱ्या सहा महिन्यानंतर देखील कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती बघून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील कंपनी च्या माध्यमाने देण्यात येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली तसेच आमदार संग्राम जगताप यांनी विवो कंपनी व उर्मी सामाजिक संघटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका विजया वराडे यांनी केले तर आभार उद्योजक कमलेश झंवर (भिंगारवाला) यांनी मानले.