विद्यार्थी वाहतूकदारांना करातून १०० टक्के सवलत

नगर : अखेर वाहतूक सेनेच्या पाठपुराव्याला यश आले असून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूक दारांना १०० टक्के कर माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्कुल बस वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या २ वर्षांपासून नगर शहर शिवसेना वाहतूक सेनाप्रमुख संजय आव्हाड यांनी या बाबत चा प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केला होता. या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी  वाहतूक सेने बरोबर अखिल महाराष्ट्र विद्यार्थी महासंघाचे राज्याध्यक्ष उदय दळवी,महासचिव श्री मांडवे, उपाध्यक्ष श्री पावसे,सचिव शेख सिद्दीकी, प्रसिद्धी प्रमुख योगेश कांबळे आदींनी प्रयत्न केले. कोरोना महामारीचा फटका स्कुल बसेसना बसला.

गेल्या २ वर्षांपासून कोविड मुले शाळा बंद राहिल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना १०० टक्के कर माफी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.यात शाळांच्या मालकीच्या तसेच स्कुल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने आण  करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त च्या इतर स्कुल बसेसना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधी साठी करा तुन १०० टक्के माफी देण्यात आली.

विद्यार्थी वाहतूक दारांना करातून १०० टक्के सवलत वाहतूक सेनेचे संजय आव्हाड यांच्या प्रयत्नाने मिळाल्याने त्यांचा शिवसेना युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, दत्ता जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर,सचिन जाधव, नगर सेवक, मदन आढाव, परेश लोखंडे, शाम परदेशी,सुमित धेंड, अक्षय दतरंगे, गिरीश जाधव, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ.गोयल,आदींनी संजय आव्हाड यांचा सत्कार केला यावेळी स्कुल बस धारक सुनील रासकर, भाऊसाहेब गुंड,पांडुरंग जाधव,बाळासाहेब फुलडहाळे, भाऊसाहेब टीमकरे, सुरेश विघ्ने , संदेश रासकर, राजू चौधरी , अशोक गदादे, अक्षय पवार, अशोक शेळके आदी उपस्थित होते.