शिर्डी ,अकोले ,कर्जत ,पारनेर मध्ये नगरपंचायत रणधुमाळी सुरु.

जिल्ह्यातील शिर्डी ,अकोले,कर्जत ,पारनेर या चार नगर पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २१ डिसेंमबर रोजी होणार आहे .त्यासाठी बुधवार पासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रारंभ होणार आहे . त्यामुळे या चारही शहरात राजकीय रनधुमाळी सुरु झाली अहे . 
पारनेर ,कर्जत,अकोले या तीन नगर पंचायतीचा कालावधी ५ नोव्हेंबर २०२० रोजी संपला आहे .  निवडणुकीची तैयारी सुरु असताना कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निवडणूक लांबणीवर टाकली गेली होती . पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपताच राज्य सरकारने या तिन्ही नगर  पंचायतींवरच प्रशासक नियुक्त केले होते . त्यानुसार शिर्डी ग्रामपंचायतीचा कालावधी २७ डिसेंबर २०२१ रोजी सम्पणार आहे  त्या मुळे राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात शिर्डी सह या तीन नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर  केला होता . जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी दि. ३० , रोजी याचारही नगर पंचायतीचा कार्यक्रम जाहीर केला .त्या नुसार १ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे . उमेदवारी अर्ज राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाइट वर भरावा लागणार आहे .  इच्छुकांना ७ डिसेंबर पर्यंत अर्ज भारत येणार आहे . ८ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे  . ज्या ज्या अर्जावर अपील नसेल ते अर्ज १३ डिसेंबर ,तर अपील असणाऱ्या अर्ज १६ डिसेंबर पर्यंत मागे घेतला जाणार आहे . त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात शिर्डी अकोले कर्जत   पारनेर या शहरातील राजकीय वातावरण तापले आहे . पक्षाची उमेदवारी प्राप्त व्हावी म्हणून इच्छुकांचा मोर्चे बांधणीला वेग आला आहे .