शिवराष्ट्र पक्षाचा प्रथम वर्धापन दिना निमित्त शिवराष्ट्र विद्यार्थी सेनेची स्थापना

वर्षभरापूर्वी संतोष नवसूपे यांनी स्थापन केलेला  शिवराष्ट्र पक्षाचे अवघ्या काही दिवसातच  या पक्षाचे वटवृक्षात रूपांतर करून सामान्य नागरिकांचे प्रश्न वेळो वेळी सोडवून आवाज उठवला असून वर्षभरात या पक्षाने  नगर शहरातील राजकारणात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे . तळागाळातील व्यक्तींना बरोबर घेऊन संतोष नवसूपे यांनी शिवराष्ट्र पक्ष स्थापन केला . त्या पक्षाचा आज प्रथम वर्धापन दिन बुरूडगाव रोड येथील  पक्ष कार्यालयात साजरा करण्यात आला .

या वेळी  विद्यार्थ्यांचे व विध्यर्थीनींचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवराष्ट्र विध्यार्थी सेनेची स्थापन करण्यात आली असे पक्षाध्यक्ष संतोष नवसूपे यांनी सांगितले ,तसेच पक्षवाढीसाठी पदनियुक्त्या करण्यात आल्या ,  यावेळी विध्यर्थी सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून कृष्णा अमृते यांची निवड करण्यात आली तसेच श्री सचिन गुंजाळ दैठणे गुंजाळ यांची पारनेर तालुका अध्यक्षपदी निवड क्लरण्यात आली  यांचे नियुक्ती पत्र पक्षाध्यक्ष संतोष नवसूपे व ओबीसी सेल चे  बाबासाहेब  करपे यांचा हस्ते देण्यात  आले , या वेळी पक्ष स्थापनेत महत्वाचा वाट असणारे भैरव नाथ खंडागळे यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे त्यांना पक्षाचा वतीनेश्रद्धांजली वाहण्यात आली .या वेळी सांस्कृतिक विभागाचा रत्ना नवसूपे महिला आघाडीचा जिल्हा अध्यक्ष  ऍड अनिता दिघे युवा सेनेचे शंभू नवसूपे  ,भींगार मंडल  अध्यक्ष राकेश सारवान ,व असंख्य विध्यार्थी उपस्थित होते .