शेवगाव शाखेतील सोने तारण घोटाळ्यातील मुख्य आरोपी जेरबंद

शेवगाव : शाखेतील सोने तारण नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपीला शेवगावमध्ये अहमदनगर गुन्हे शाखेने अटक केली . विशाल गणेश दहिवाळकर असे आरोपीचे नाव आहे . आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करून त्यांना अटक केली , विशाल दहिवाळकर यांच्यावर अगोदरच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . तो या बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य आरोपी आहे .
बनावट सोने तारण प्रकरणामधील जून २०१ ९ मध्ये व्यवस्थापक अनिल वसुदेव आहुजा यांनी गुन्हा दाखल केला होता . यामध्ये १५ ९ कर्जदार व सव्वा पाच कोटी तीस लाख कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे . यामध्ये सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गांधी यांनी हा भ्रष्टाचार बाहेर आणण्यासाठी मोठा लढा उभारला होता . त्यांना एवढी याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की , हा प्यादा आहे मोठे मासे अजून बाकी आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.