श्रमिक कार्ड नोंदणी शिबिरामध्ये ४२८ लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नगर दक्षिण लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा.डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित चिचोंडी पाटील येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत श्रमिक कार्ड नोंदणी शिबिरामध्ये ४२८ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी दिली.यावेळी अनेक जेष्ठ मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, खासदार सुजयदादा विखे यांची भूमिका नेहमी तळागाळातील सामान्य माणसाला न्याय देण्याची असते. अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी करून त्यांनी हजारो सामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्याच कामांची प्रेरणा घेऊन आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केलेले असून येत्या दिवसांमध्ये चिचोंडी पाटील गटामधील प्रत्येक गावामध्ये सदर शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.