सराईत गुन्हेगाराला अटक .

नागपूर एमआयडीसीचा सुरक्षा रक्षकाला मारहाण करून कॉपर पट्ट्यांचे दहा बॉक्स पळविणाऱ्या मोक्काचा गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने मंगळवारी अटक केली . सागर गोरख मांजरे (वय २५ ,रा मातापूर ,श्रीरामपुर)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .

फिर्यादी शिवाजी भगाजी कुंदनकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून एमआयडीसी पोलीस ठणकत गुन्हा दाखल करण्यात आला होता . इलेकट्रोनिक कंपनीचा सुरक्षा रक्षक सोन्याबापू विजय पळसकर व विलास परसराम नेवसे याना मारहाण करून आरोपीने कोपर पट्ट्यांचे दहा बॉक्स चोरून नेण्याची घटना घडली होती . या घटनेतील मुख्य आरोपी मांजरे हा कल्याण रोड परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके याना मिळाली होती , त्यानुसार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले .