हिंदवी स्वराज्य स्थापने मागची शिवाजी महाराजांची भूमिका समजून घेणे ही आजची गरज : प्रांत संघचालक नाना जाधव

अहमदनगर (प्रतिनिधी): आजकाल काही कथित समाजनेते छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणून बुजून धर्मनिरपेक्ष ठरविण्याचा खटाटोप करीत आहेत. वास्तविक गेल्या तीन चार दिवसापासून ज्या समाज विघातक घटना घडत आहेत. त्यावरून हिंदवी स्वराज्य स्थापने मागची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची काय होती हे समजून घेणे आवश्यक आहे . असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक, राहुरी कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ नाना जाधव यांनी केले आहे.
नगरच्या माउली संकुल येथे ३५० व्या हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधून  शंभूगाथा या महाकाव्याचे लेखक युवा कवी अभि मुंडे यांच्या काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी आयोजक नितीन उदमले फाउंडेशन चे अध्यक्ष नितीन उदमले हे व्यासपीठावर उपस्थित होते .
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. ६ जून या दिवसाला हिंदू साम्राज्य दिन, शिव साम्राज्य दिन असे म्हटले जाते कारण शेकडो वर्षांच्या कालखंडानंतर हिंदूंचे साम्राज्य प्रस्थापित होत होते. त्यांनी शेतीत सुधारणा केल्या. ते न्याय प्रिय होते. त्यांचे युद्ध कौशल्य हे मोठे होते. त्यांनी प्रजाहितदक्ष राज्य कारभाराची उत्कृत्ष्ट घडी बसवली होती. असे अनेक गुण शिवाजी महाराजांकडे होते . पण त्यापुढे हि जाऊन मुस्लिम राज्य कर्त्यांच्या शरियत च्या आधारे सगळा राज्य कारभार चालत होता ही व्यवस्था महाराजांनी मोडून काढली आणि  हिंदू साम्राज्य स्थापन केले. त्यामुळे आपण शेकडो वर्षानंतर हिंदू साम्राज्य दिन आपण साजरा करतो.
पण शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते हे सांगणारे तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते ते हिंदूंची उपेक्षा करतात आणि अन्य धर्मियांच्या बाबतीत पक्षपात करणे यालाच ते धर्मनिरपेक्षता म्हणतात. अशी सध्याची स्थिती आहे. हिंदू हितासाठी धडपडणारे, हिंदूंच्या हिंदुत्वाची भाषा बोलणाऱ्यांना हे धर्मनिरपेक्षतावादी जातीयवादी म्हणतात. परंतु त्यांचे एक दुर्दैव आहे की महाराजांच्या बाबतीत त्यांची पंचाईत होते. कारण छत्रपतींचे स्थान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील प्रत्येकाच्या हृदयात असल्यामुळं महाराजांची प्रतिमा मालिन करणे हे या सर्वाना अजून तरी शक्य झालेले नाही . आणि कदाचित पुढच्याही काळात हे होणार नाही ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांचे हात पोळले गेल्याचे आपण अनुभवतो. त्यामुळे या नेत्यांनी शिवाजी महाराजांना आपल्या धर्म निरपेक्षतेच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्या साठीच महाराजांचा खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात. उदा. महाराजांनी कशा मशिदी बांधल्या. महाराजांनी नवीन मशिदी साठी इनामे दिली. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते. परंतु वारंवार तेच खोटं पुन्हा पुन्हा सांगितले तर ते खरे वाटायला लागते ही गोबेल्स नीती विरोधक वापरत आहेत. पण त्याला छेद देणारे संशोधन  इतिहासाचे गाढे अभ्यासक गजानन मेहेंदळे यांनी सर्व आक्षेपांचे खंडन करीत हिंदू साम्राज्य संस्थापक हे पुस्तक लिहिले ते आपण जरूर वाचावे. म्हणजे महाराज हे हिंदुत्ववादी होते हे आपल्याला समजेल. भारत पाक सीमेवरील जैसलमेर येथे घराघरातील देव्हाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत. राज्यस्थान कुठे आणि महाराष्ट्र कुठे ? शिवाजी सारखा राजा जर त्यावेळी जैसलमेर मध्ये असता तर आज पाकिस्तान ची सीमा जैसलमेर पासून काही हजार किलोमीटर लांब असती अशी त्या भागातील लोकांची धारणा आहे. यावरून आपल्याला महाराजांचा हिंदुत्ववादी बाणा आपल्याला समजतो. असे ते म्हणाले .
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात संयोजक नितीन उदमले यांनी नाना जाधव, अभि मुंडे यांचे स्वागत करीत म्हंटले की, वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी  मूळच्या अंबेजोगाईच्या आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेल्या अभि मुंडे यांनी अतिशय नितळ, पवित्र आणि शुद्ध असं काव्य छत्रपती संभाजी महाराज याच्या जीवनावर लिहिलं. मन शुद्ध असल्याशिवाय आणि पूर्व पुण्याई असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही. अभि दादांनी आपल्या काव्यामध्ये जे मांडले आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य आपण करणार आहोत. काळाची ती आवश्यकता आहे. त्यामुळे अभि मुंडे यांच्या शंभू गाथेला सर्वजण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत.
त्यानंतर युवा कवी अभि मुंडे यांच्या काव्यमय वाणीतून शंभू गाथा सादर केली. मला माझ्या राजाची कीर्ती ही भारतात नाही जगात नाही तर ब्रम्हांडाच्या पाठीवर न्यायची म्हणून ही काव्य निर्मिती मी हिंदीतून केली आहे आणि महाराष्ट्र असे राज्य आहे कि जेथे कविता लिहिली जात नाही तर महाराष्ट्र हा जिता जागता कविता संग्रह आहे म्हणून हे काव्य आपण रचले .

शेरनी के कोक से एक बालक ने जनम लिया !
शिवजी ने खुद्द का अंश वसुधा को भेट दिया !
हर घर उत्सव, हर पत्थर मे उत्सव, हर पर्बत पर उत्सव
सर सर्वत्र उत्सव
या पदाने त्यांनी आपल्या काव्य सादरीकरणाला सुरुवात केली तेव्हा सभागृह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जडण घडणीचे आणि पराक्रमाचे गोडवे काव्य रूपात सांगताना अभि मुंडे यांनी प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच आणले.
छत्रपती शिवाजी आणि औरंगजेब भेटीचा प्रसंग त्यांनी आपल्या काव्यातून मांडला.
हा यही एक नाम सूनके कापती थी सलतनत
येही था जो नाम पुहचा हिंदवी के दरतलत
हा इसी ने तोडे थे मंदिर कई कई शिखर
नादान था जो तोड रहा उसी खुदा का दुजा घर
पर आया शेर ए हिंद शिवा हे आया साथ अपना छावा लाया
इन्शा अल्लाह नूर देख भगवे का सुरूर देख
दिल्ली के ऊस तख्त को चिरती नजर देख
सुरमे को जलाने वाली आँखो का कहर देख
देख आँखे फाड देख पेड झाड देख
बादशाह के रास्ते का सबसे बडा पहाड देखअसे म्हणताच टाळ्या शिट्ट्या आणि घोषणांनी सभागृह दणाणले.बत्तमिजी कि सजा केह

 कर पिता पुत्र को कैद किया
आगे से ना हो सका तो पीठ मे खंजर खौप दिया
अरे कैद हुए राजे बेशक पर सोच तो आजाद हुई
और उनकी सोच को कैद करे वो जंजीर कही मौजूद नहीछत्रपती संभाजी महाराज याच्या पराक्रमाचे वर्णन करतानासर लष्कर पश्चात मची हलचल मुगलो के डेरे मे
लो अब संभा की खैर नही फस गया मौत के घेरे मे
पर हुजूर वो जब सामने आया तब हर बार उठे जनाजे हे
औरंगाबाद बुऱ्हाणपूर के जख्म अभि भी ताजे हे
अरे इब्लिस की फौज हुजूर सर कफन बांध दौडी थी
ऐसा लुटा था संभा ने हर लंगोट तब ना छोडी थी
आणि शेवटच्या सत्रात छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन करताना
प्रहार करे तो धरती कापे
कडकडता वो वज्र हे शंभू
भस्म का जो शृंगार करे                                                                                                                                                           महादेव का रुद्र हे शंभू
अशा शब्दात त्यांनी केले .

कार्यक्रमाची सुरुवात अजित पंडित यांच्या वयक्तिक गीताने झाली. नंतर दीप प्रज्वलन आणि शिव शंभो पुतळा पूजन करण्यात आले. अभि मुंडे आणि नाना जाधव याचे स्वागत आणि सत्कार नितीन उदमले यांनी केला. सूत्र संचालन  श्याम पिंपळे यांनी केले तर आभार हिंदू राष्ट्र सेनेचे संजय अड़ोळे यांनी मानले. शिव वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.