हृदयस्पर्शी ,आदर्शमय प्रेमकथा असलेल्या “का रं देवा” चा ट्रेलर लाँच

"का रं देवा" ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हृदयस्पर्शी आदर्शमय प्रेमकथा असलेला ‘का रं देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अभिनेता मयूर लाड ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भेटीस येणार आहे.

सह्याद्री फिल्म प्रोडक्शनच्या निर्माते प्रशांत शिंगटे यांनी “का रं देवा” चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत जाधव यांचं आहे. सुशांत माने, तानसेन लोकरे यांची गीतं संदीप भुरे यांनी संगीतबद्ध केली आहेत. श्रेयश आंगणे यांच पार्श्वसंगीत आहे , संकलन यश सु्र्वे यांनी उत्तम केल आहे तरी एक आदर्शमय प्रेमकथा अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर अतिशय लक्षवेधी आहे. तसंच चित्रपटाची श्रवणीय गाणीही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत

सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मधुर शिंदे, डॉ.नेहा राजपाल, सुप्रिया सोरटे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. अभिनेते नागेश भोसले, अरूण नलावडे, जयवंत वाडकर असे अनुभवी कलाकार, टिकटॅाक स्टार सुरज चव्हाण आणि किरण जाधव, अश्विनी बागल, पल्लवी चव्हाण असे नवोदित कलाकार या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत.

एका गावातील कॉलेजवयीन तरुण-तरुणीचं एकमेकांवर असलेलं प्रेम, सोबत घालवलेले क्षण  आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमकथेत निर्माण झालेले चढ-उतार अशी या चित्रपटाची कथा आहे. या कथेला जिमी, ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेलं उत्तम छायाचित्रण डोळ्यांचं पारणं फेडतं. त्यामुळे सकस कथा, दमदार अभिनेते, श्रवणीय संगीत अशा सर्वच अंगांनी उत्तम असलेला का रं देवा या चित्रपटावर प्रेक्षक पसंतीची मोहोर उमटेल यात शंकाच नाही. येत्या ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.