
भारतीय रेल्वेने दीर्घ काळानंतर प्रवास भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलैपासून ही भाडेवाढ लागू होईल.
कुठे किती वाढ?
सामान्य द्वितीय श्रेणी (Ordinary 2nd class)
५०० किमीपेक्षा कमी प्रवासाला कोणतीही भाडेवाढ नाही.
५०० किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी प्रति किमी 0.5 पैसा वाढ — म्हणजे १००० किमी प्रवासासाठी फक्त ₹2.50 जास्त.
बिगर-एसी मेल / एक्सप्रेस
प्रति किमी 1 पैसा वाढ — १००० किमी प्रवासासाठी सुमारे ₹10 जास्त.
सर्व एसी डबे
प्रति किमी 2 पैसे वाढ — १००० किमी प्रवासासाठी सुमारे ₹20 जास्त.
उपनगरी रेल्वे प्रवासी आणि हंगामी पासधारकांना दिलासा!
मुंबई, कोलकाता सारख्या शहरांतील लोकल प्रवास भाडेवाढीपासून वगळला आहे.
मासिक हंगामी तिकिटांचे दर जैसे थे राहणार आहेत.
भाडेवाढ का?
रेल्वेच्या परिचालन खर्चात प्रचंड वाढ झाली असून, उत्पन्नात आवश्यक तो ताळमेळ बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य मुद्दे —
लांब पल्ल्याचे प्रवासी आणि नियमित प्रवास करणाऱ्यांना थोडी झळ.
भाडेवाढ अत्यल्प असून लोकांना फारसा आर्थिक भार पडणार नाही.
उपनगरी प्रवासावर कोणताही परिणाम नाही.