अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तानाजी शिंदे यांना गावातील गाव गुंडांकडून मारण्याची धमकी.
पारनेर येथील पिंपळगाव रोठा येथील सामाजिक कार्यकर्ते व अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी उमाजी शिंदे यांना गावातील काही गाव गुंड प्रवृत्तीचे स्वप्नील बाबासाहेब पुंडे व त्यांचे वडील बाळासाहेब पुंडे यांनी 4 जानेवारी 2022 रोजी मारहाण केली व त्यानंतर मी त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस स्टेशन येथे यांची एन.सी. दाखल केली असता 7 जानेवारी 2022 रोजी वरील गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी मला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली असता मी त्यांच्यावर परत एन.सी.दाखल केली परंतु 4 जानेवारी पासून ते 10 जानेवारी पर्यंत पारनेर पोलीस स्टेशन मधील कुठल्याही अधिकाऱ्यांनी माझ्याविषयी गंभीर दखल घेतली नाही त्यामुळे माझ्या जीवितास धोका असून सदरील आरोपींविरूद्ध लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तान्हाजी उमाजी शिंदे समवेत भारतीय टायगर फोर्सचे जिल्हा महासचिव नागेश शिंदे, सिताराम खाकाळ आदी उपस्थित होते वरील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर येत्या आठ दिवसात कायदेशीर कारवाई न झाल्यास पारनेर पोलीस स्टेशन येथे अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.