पत्रकार दिनानिमित्त जामखेड तहसील कार्यालयात पत्रकारांचा कोविड काळातील कार्य बद्दल सन्मान पत्र देऊन गौरव

जामखेड – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील पत्रकारांचा जामखेड तहसील कार्यालयात प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी शिक्षण घेत असताना वयाच्या २० व्या वर्षापासून दर्पण हे वृत्तपत्र चालू करून समाजाच्या समस्या मांडून जनजागृती होईल व इंग्रजांना ते समजावे म्हणून एकाच पानावर मराठी व इंग्रजीच मजकूर छापला.
ज्या वयात काही समज नसते त्या वयात जांभेकरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून देशाला कसे स्वतंत्र मिळवुन देऊ शकतो व समाजाला कसे जागरूक करू असा महान विचार आपल्या लेखणीतून दिला
शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार बांधव करत असतात तसेच ज्या ठिकाणी कोणतेही संपर्कचे साधन नसते त्या घटकांन पर्यंत पोहचुन त्या लोकांना न्याय देण्यास प्रशासनाला भाग पाडतात
आपण सर्व पत्रकार बांधवानी कोरोना काळात प्रशासनाला खुप मदत केली त्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांचा सन्मान व्हावा अशी कल्पना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांच्या कडे मांडली व त्यांनी तत्काळ संमती दिली यावेळी
जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक देवमाने, अशोक निमोणकर, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय वडे, वसंत सानप, मिठूलाल नवलाखा, सुदाम वराट, मोहिद्दीन तांबोळी, प्रकाश खंडागळे, यासीन शेख, अशोक वीर,नंदुसिंग परदेशी, समीर शेख, अविनाश बोधले, ओंकार दळवी, विजय अवसरे, दत्ता राऊत,राजु भोगील, संजय वारभोग, लियाकत शेख, धनराज पवार, विजय अवसरे, शिवाजी इकडे, किरण रेडे, फायकभाई शेख, सचिन अटकरे, संतोष गर्जे, संजय लहाने, जाकीर शेख, विजय राजकर, तान्हाजी पवार, अक्षय ठाकरे यांच्या सह सर्वच पत्रकार उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार भोसेकर यांनी तर सुत्रसंचालन अशोक यादव यांनी केले