अपहरण झालेल्या कुटुंबाचे तोफखाना पोलीसांविरुद्ध न्यायालयात आरोप
अहमदनगर – दि. १३ आॅक्टो२०२३ रोजी भिस्तबाग येथील कुटुंबतील ४ जणांचे अपहरण झाल्याचे त्यांच्या सुटकेनंतर २३ आॅक्टो २०२३ रोजी उघडीस आले. एकुण सहा आरोपींपैकी २ आरोपींना पोलीसांनी अटक केली व ४ इतर आरोपी अद्याप फरार आहेत. माधव उर्फ मनिष ठुबे व सीए दत्ता हजारे अशा अटक आरोपींना मा. न्यायलयाने दि. ३०आॅक्टो२०२३ पर्यंत पोलीस कस्टडी दिला होती व ३१ आॅक्टो २०२३ रोजी या आरोपींनी न्यायालयापुढे जामिन अर्ज केला होता. यावेळी अपहरण झालेले मुळ फिर्यादी अजय बाळासाहेब जगताप व त्यांच्या कुटुंबाच्या वतीने ॲड.सत्यजीत कराळे पाटील यांना न्यायालयात युक्तीवाद केला. युक्तीवादात मुळ फिर्यादीच्या वतीने सांगण्यात आले की, ओरोपी ठुबे याच्यामुळे फिर्यादीच्या जिवितास धोका आहे. सदर फिर्याद ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे घेतली नसुन पोलीसांनीच फिर्यादीला धमकावले व उलट केसेस करण्याची भिती दाखवली. फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे जबाब घेतले नसुन पोलीसांनी जबाब चुकीचे घेतले आहेत, तसेच पोलीस फिर्यादींना सहकार्य करत नसुन उडवाउडवीते उत्तर देत आहेत व योग्य तपास करत नाहीत असे न्यायालयात मांडले.
याबाबत अधिक माहीती ॲड. शिवाजीराव कराळे पाटील व मुळ फिर्यादी अजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदर मुळ फिर्यादी अजय जगताप तर्फे ॲड. शिवाजीराव कराळे पाटील, ॲड. सत्यजीत कराळे पाटील व ॲड. करुणा शिंदे हे कामकाज पाहत आहेत