नेवासे — नेवासे शहरातील मुस्लिम समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर करून गेल्या दोन महिन्यांपूर्वी नेवासे शहरात अश्लिल व आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करुन बदनामी करण्याची घटना उघडकीस आलेली होती . या घटनेचा तपास नेवासे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक माणिक चौधरी व पोलिस पथकाने सायबरसेलची मदत घेऊन घटनेचा सखोल तपास करत गणेशपेठ पुणे येथून निखिल रविकिरण पोतदार या आरोपीला ताब्यात घेऊन पुणे येथून अटक केली . पोलिसांकडून आरोपीला अटक केल्यामुळे या घटनेचा उलगडा होण्याची चिन्हे निर्माण झाल्यामुळे मुस्लिम समाजात पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले जात आहे .
नेवासे ठाण्यात शहरातील सामाजिक कार्यकर्ते पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर करुन गेल्या दोन महिण्यापूर्वी पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर करत नेवासे शहरात टिंगल – टवाळी करत अश्लिल व अक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करुन बदनामी केलेली होती . याबाबत पठाण यांनी नेवासे पोलिस गुन्हा दाखल केल्यानंतर नेवासे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी , पोलिस उपनिरिक्षक समाधान भाटेवाल , अशोक ‘ कुदळे , केवळ राजपूत , अंबादास गिते यांच्या विशेष पथकाने अहमदनगर सायबर सेलची मदत घेत गणेशपेठ पुणे येथून निखिल रविकिरण पोतदार याला अटक केली . आरोपीला नेवासे न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे .