आंतर महाविद्यालयीन क्रिकेट मुली स्पर्धेत न्यू आर्टस् महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले

नुकत्याच पाथर्डी येथे सा.फु.पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांचे संयुक्त विद्यमाने बाबूजी आव्हाड महाविद्यालयात पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातून एकूण आठ संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या संघाने मालपाणी  कॉलेज या संघाचा 45      धावानी दणदणीत विजय मिळविला.
 तसेच के.जे.एस. महाविद्यालय कोपरगाव या संघाचा 4 धावानी विजय मिळवून अंतिम सामना बाबुजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी व न्यू आर्टस् महाविद्यालय   यांच्यात झाला यामध्ये बाबुजी आव्हाड महाविद्यालय विजयी ठरलें व न्यू आर्टस महाविद्यालय उपविजेते ठरले या स्पर्धेतून विभागीय स्पर्धेसाठी 1) कु श्रेया गडाख २) कु भाग्यश्री झरेकर 3)कु बंडी विशाखा 4)कु कल्याणी भागवत यांची लोणावळा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
      या यशामागे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष मा.आ. नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष आदरणीय  रामचंद्र दरे साहेब, सचिव आदरणीय जी.डी. खानदेशे साहेब, सह सचिव अडव्होकेत आदरणीय विश्वासराव आठरे पाटील ,खजिनदार आदरणीय मुकेश दादा मुळे संस्थे चे सर्व विश्वस्त,सदस्य,व महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे,उप प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे.उप प्राचार्य डॉ.संजय कळमकर, सर्व विभागाचे विभागप्रमुख,सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या सर्व खेळाडूंना  जिमखाना विभागाचे विभाग प्रमुख डॉ.शरद मगर, प्रा सुधाकर सुंबे प्रा धन्यकुमार हराळ, प्रा धनंजय लाटे,अप्पा दाते,तुषार चौरे  यांचे मार्गदशन लाभले.