आमदार रोहित पवार यांचा नेतृत्वाखाली एक हाती सत्ता .
कर्जत (दि. १९) – – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एक धक्का दिला त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायत मध्ये एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने मिळवली आहे 17 पैकी 15 जागा या दोन पक्षांनी मिळवले असून भारतीय जनता पक्षाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत.
कर्जत नगरपंचायत 17 जागांसाठी निवडणूक झाली यातील एक जागा सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध मिळवली होती. त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे चार जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती सुरुवातीला बारा जागांसाठी मतदान झाले तर काल चार जागांसाठी मतदान झाले. आज सकाळी कर्जत तहसील कार्यालयामध्ये मतमोजणीस सुरूवात झाली.
या निवडणुकीमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली मात्र अवघ्या दोन जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. या निवडणुकीमध्ये राम शिंदे यांनी मौन धारण करत आमदार रोहित पवार यांच्या दडपशाहीच्या विरोधात आंदोलन केले व वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील मतदारांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वावर याठिकाणी विश्वास व्यक्त केल्याचे दिसून आले.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने 17 पैकी 15 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व निर्माण केले माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा या ठिकाणी मोठा पराभव झाला भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी अवघ्या दोन जागा मिळाल्या . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 12 काँग्रेस तीन व भारतीय जनता पक्ष दोन अशा जागा मिळाल्या आहे . निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या सर्व शहरांमध्ये प्रचंड जल्लोष केला .