आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे कर्जत शहरात आयोजन.

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत शहरात राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे . बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि हीच परंपरा जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी या शर्यतीचे आयोजन केले आहे . बैलगाडी शर्यतीचे दुसरे पर्व असून या शर्यतीमधील विजेत्यांना लाखोंची बक्षीस देखील दिली जाणार आहेत.
                    शेतीच्या कामाव्यतिरिक्त आपली परंपरा जपण्यासाठी तसेच शेतकरी आणि बैलाचे असणारे नाते आणखी घट्ट करण्यासाठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते  . ग्रामीण भागात विविध प्रकारच्या शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी आणि कमी अंतराच्या मालवाहतुकीसाठी गेल्या अनेक वर्षापासून बैलगाडीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे . आपल्या कृषी प्रधान संस्कृती महाराष्ट्रात बैलपोळा हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो .त्यानंतर आता राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करून शेतकऱ्यांसाठी प्रतिष्ठेची आणि सन्मानाची समजली जाणारी अशी परंपरा जोपासण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी या शर्यतीचे आयोजन केले आहे.