आरपीआयच्या युवक जिल्हाध्यक्षपदी अमित काळे कायम

येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची लोणावळा येथे भेट घेऊन चुकीच्या पध्दतीने व अधिकार नसताना जिल्हाध्यक्षांनी केलेली निलंबनाच्या कारवाईची व केलेले खोट्या अरोपांच खंडन करुन सविस्तर माहिती देऊन अहवाल सादर केला. ना. आठवले यांनी दक्षिण जिल्हाध्यक्ष यांना फोनवर संपर्क करुन अमित काळे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहाणार असल्याच्या सुचना केल्या आहेत. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव उपस्थित होते.


नुकतेच आरपीआयमध्ये दोन गट पडून अमित काळे यांना निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागले. जिल्हा पदाधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकित जिल्हाध्यक्षांनी त्यांचे निलंबन करत असल्याचे पत्रक काढले होते. तर राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी जिल्हाध्यक्षांना निलंबन करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करुन काळे यांच्याकडेच युवक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी राहणार असल्याचे जिल्हा कार्यकारणीस कळवले होते. या अनुशंगाने अमित काळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. आठवले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करुन अहवाल सादर केला. ना. आठवले यांनी जिल्ह्यात युवकांचे संघटन वाढवून काम सुरु ठेवण्याचे स्पष्ट केले. यावेळी काळे यांच्यासह आरपीआयचे   विभागीय जिल्हाप्रमुख भिमराज बागुल, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांतजी पाटील, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, मराठा आघाडी राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे, उत्तर महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष बंटी भिंगारदिवे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा जगताप, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, उमेश आमटे, प्रविण मोरे, प्रसिद्धीप्रमुख हेमंतजी रणपिसे, देवेंद्र रणपिसे, महेश लंकेश्‍वर आदी उपस्थित होते.