कलम ३०७ रद्द करण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट

नगर – दि ३ जाने २०२२ सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पारशाखुंट येथे मुलांच्या वादातून भांडण झाले व त्यातून त्याभागात दगडफेक झाली .त्यानंतर दोन्ही बाजूची लोक एकत्र येऊन झालेले वादाविषयी मिटवून घेतले आणि या वादामध्ये काही लोक जखमी सुद्धा झाले ते उपचार घेत आहेत . दोन्ही बाजूनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही त्याच बरोबर पोलिस प्रशासनाने खबरदारी म्हणून गुन्हा दाखल केला .त्यामध्ये ३०७ या गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात आले .या दाखल झालेले गुन्हा मध्ये विद्यार्थी असून त्यामुळे त्याचे भवितव्य अडचणीत येऊ शकते.तरी यांचा आपण विचार करावा असे शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन देऊन चर्चा केली यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम ,युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड ,माजी गटनेते संजय शेडगे ,नगरसेवक दता कावरे ,सचिन शिंदे , योगीराज गाडे ,संतोष गेणपा , गिरीश जाधव आदी उपस्थित होते .