काँग्रेस नेते हार्दिक पटेल आज कर्जतमध्ये – मतदारांना संबोधित करणार
आज कर्जत येथे काँग्रेस नेते व गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, कर्जत नगरपंचायत निवडणूक सध्या चर्चेत आहे. राज्य तसेच देश पातळीवरील मोठे राजकीय नेते नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे येत असल्याने या सभेला मोठ्या प्रमाणात जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.eकाँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल आणि राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे हे कर्जतच्या जनतेला संबोधित करणार आहेत.
२१ तारखेला नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.या निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.