पाथर्डी तालुक्यात रंगलेल्या उत्तर महाराष्ट्र्र कुश्ती चषक स्पर्धेत नगरचा सुदर्शन कोतकर याने नाशिक येथील मल्ल बाळू बोडखे याचा विरोधात तब्बल सव्वा तास लढत देऊन त्यास चितपट करत उत्तर महाराष्ट्र्र कुश्ती चषक पटकवला .यावेळी विजयी मल्लास ऍड .ढाकणे यांनी चांदिची गदा व ५१ हजार रुपयांचे रोक बक्षीस दिले .
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा मान्यतेने अहमदनगर जिल्हा तालीम संघ संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे व श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांचा सयुंक्त विद्यमाने एम एस निऱ्हाळी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात कुस्त्यांचा थरार रंगला. सकाळ ते संध्याकाळ पर्यंत सहा गटात कुस्त्या रंगल्या होत्या .सर्व कुस्त्या मॅटवर घेण्यात आल्या . शेवटी उत्तर महाराष्ट्र कुश्ती चषक स्पर्धेची कुस्ती लाल मातीत बेमुदत लावण्यात आली .