पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

पैगंबर मोहम्मद बिल मुस्लिम आरक्षणसह मुस्लिम  समाजाच्या संविधानिक अधिकारासाठी व राज्य शासन अल्पसंख्यांक विरोधी धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे , महासचिव योगेश साठे , जिल्हा सल्लागार जीवन पारधे , फिरोज पठाण , संजय जगताप , प्रवीण ओरे , भाऊ साळवे , अमर निरभवणे , मनोज साळवे , सुनील भिंगारदिवे , प्रमोद आढाव , नामदेव भोसले , मारुती पाटोळे , विशाल साबळे , एम . बी पाटोळे , आकाश डागवाले , आदी उपस्थित होते .

मुस्लिम समाजाच्या आर्थिक , शैक्षणिक , सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व  राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणि आयोगाचे अहवाल पडून आहेत . मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत कायमच उदासीन असल्याचे दिसून येते . न्यायालयाने मान्यता दिलेल्या ५ % मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची  शासन अंमलबजावणी करीत नाही यातच शासनाची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता दिसून येते . धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे ‘ पैगंबर मोहम्मद बिल ‘ वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे , विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांच्या माध्यमातून गेल्या अधिवेशनात ते बिल मांडण्यात आले होते . येणाऱ्या अधिवेशनात पैगंबर मोहम्मद बिल मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा . शासन मुस्लिम समाजाच्या प्रश्नाबाबतीत गंभीर नाही . शासनाच्या याच वृत्तीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ५ जुलै २०२१ रोजी विधान भवनावर मोर्चा काढुन उपरोक्त मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्यात आले होते

तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातून जनजागृती अभियान चालवण्यात आले तरी ही शासनातील तिन्ही पक्ष या मागणीकडे पुर्णत : दुर्लक्ष करत आहेत परंतु वंचित बहुजन आघाडी मुस्लिम प्रश्नांबाबत गंभीर असुन सोमवार २२ नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या संविधानिक अधिकारांसाठी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणां विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे . न्यायालयाने मान्यता दिलेले ५ % मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे . धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे ‘ पैगंबर मोहम्मद बिल ‘ वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे , ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा . महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम , व मुअज्जिन आणि खुद्दाम हज़रात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे . संत विचारांचा प्रचारप्रसार करण्याऱ्या ह . भ . प . कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे . वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा . सारथी – बारटी – महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी . या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात सोमवार २२ नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले .