कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कि. बा.म्हस्के विशेष पुरस्कार कार्यक्रम स्थगित

अहमदनगर – – शताब्दी महोत्सवातील बीव्हीजी ग्रुप हनुमंतराव गायकवाड यांनी सांगता महोत्सव कैलासवासी भास्करराव यांच्या प्रेरणेतून संपन्न होऊन पुरस्कार वितरण कार्यक्रम जागतिक महामारी व दिग्गजांच्या दुःखद निधनामुळे यावर्षी स्थगित केला आहे सदर कार्यक्रम हा काकासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्त पाच मे रोजी होणार असल्याची माहिती आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सुभाष मस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार कोरूना च्या पार्श्वभूमीवर संगीत करण्यात आला असला तरी हा कार्यक्रम लवकरच काकासाहेब उर्फ की.बा म्हस्के यांच्या होणार असून या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावेळी पुरस्कारात बाबत बोलताना डॉक्टर म्हस्के यांनी पुणे येथील डॉक्टर संजय ओक डॉक्टर अक्कलकोटकर तसेच डॉक्टर महाजन यांचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमाच्या योजना दरम्यान खासदार सुजय विखे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते परंतु त्यांना कोरोनाची लागण झाले असल्याने त्यांचे उपस्थित राहणे शक्य नव्हते. परंतु पाच मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमला विखे आवश्यक वेळ देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन या वेळी वेळी म्हस्के यांनी केले आहे.