वन विभागाकडून आदिवासींवर अन्याय

कळसुबाई शिखराचा पायथ्याशी आदिवासी बांधवानी उभे केलेले स्टॊल वन विभागाने क्रूर पद्धतीने हटवून त्यांची रोजी रोटी हिरावली आहे . या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी तक्रार जिल्हा परिषदेचे सदस्य सीताराम राऊत यांनी पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली . त्यावर पर्यटन मंत्रांच्या उपस्थितीत वन विभागाची बैठक घेण्याचे आश्वासन पालक मंत्र्यांनी दिले . अशी माहिती राऊत यांनी दिली . गुरुवारी (दि १३) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन समितीचा बैठकीला राऊत ऑनलाईन उपस्थित होते . राऊत म्हणाले राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखर परिसरात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे . तेथे पर्यटकांसाठी सोइ सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे . शासना कडून तेथे काहीही सोइ सुविधा दिल्या जात नाहीत . आदिवासी तरुणांनी येथे सोइ सुविधा निर्माण केल्या . पर्यटकांना पाणी ,चहा , नाश्ता , पुरविण्यासाठी स्टॊल लावले . यातून आदिवासी तरुणांना रोजगार प्राप्त झाला होता , पर्यटकांचा सोइ साठी या आदिवासी तरुणांनी स्वखर्चातून पायऱ्यांची दुरुस्ती केली . मात्र वन विभागाकडून आदिवासी तरुणांवर अन्याय केला जात आहे . आदिवासी तरुणांचे ५० ते ६० स्टॊल वन विभागाने काढून टाकले . स्थानिकांचा हक्कावर वन विभाग गदा आणत आहे असे पालक मंत्री मुश्रीफ यांचा राऊत यांनी निदर्शनास आणून दिले . त्यावर आदिवासी बांधवाना कळसुबाई शिखर परिसरात रोजगार देण्याचे आश्वासन मिळाले .