नगरमधील टिंग्या टोळीतील चाैघांना पोलिस कोठडी

नगर : भाजीपाला विक्रेत्यावर धारदार हत्याराने हल्ला करून सोन्याची चैन चोरून नेल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या टिंग्या टोळीला न्यायालयाने दाेन दिवस पाेलिस काेठडी सुनावली आहे. काेतवाली पाेलिसांनी २४ तासा  चा आत टाेळी तिल  चार जणांना अटक केली.
भाजीपाला विक्रेते सतिष ऊर्फ बाळासाहेब नारायण तरोटे (रा. चितळेरोड, अहमदनगर) यांच्यावर सोमवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धारदार हत्याराने हल्ला केला होता. त्यांच्याकडील अडीच लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली होती. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली होती. यानंतर तरोटे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी टिंग्या ऊर्फ गणेश म्हसूदेव पोटे (रा. सारसनगर) व त्याचे साथीदार ऋषिकेश प्रदीप लड्डे, यश किरण पवार (दोघे रा. सिव्हील हाडको, सावेडी), अक्षय उमाकांत थोरवे (रा. पाईपलाई रोड, सावेडी) यांना मंगळवारी ताब्यात घेतले होते.
त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची माहिती दिली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. बुधवारी उपनिरीक्षक दुर्गे यांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले होते .  न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, अंमलदार योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, प्रशांत बोरूडे, नितीन शिंदे, राठोड यांच्या पथकाने केली.