गावठी कट्टे विक्रेत्याला वेशांतर करून पकडले

कारवाई : एक लाख तेरा हजारांचा मुद्देमाल जप्त

         गावठी कट्टे व काडतूसे विक्रीसाठी बीड जिल्ह्यात घेऊन जात असताना पोलिसांनी फाल विक्रेते , रीक्षाचालकांचा वेश धरण करून एका सराईत गुन्हेगारस येथी चाँदनी चौकातून अटक केली. त्याच्याकडून सुमारे एक लाख १३ हजार रुपये किमतेचे तीन गावठी कट्टे व १२ जीवंत कडतूसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
         सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान (वय २३, रा. माळीवेस ,सुभाष रोड ,बीड) असे आरोपीचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील एक सराईत  गुन्हेगार  गावठी कट्टे व काडतूसे घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त खबर्‍यामार्फत मिळाली होती. हा आरोपी नगरमधील आरटीओ कार्यालयासमोर चाँदनी चौकात  येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
          या नुसार पोलिस   निरीक्षक कटके यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक    सोपान गोरे, मोहन गाजरे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ ,संजय खंडागळे , भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळिक , पोलिस हेड  कॉन्स्टेबल विजय वेठेकर ,देवेंद्र शेलार , सुरेश माळी, संदीप  घोडके, पोलिस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळुंके ,रवी सोनटक्के, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र घुगासे, विजय धनेधर, सागर ससाणे, मयूर गायकवाड, चालक उमाकांत गावडे, भरत बुधवंत   यांच्या पथकाने चाँदनी चौकात  फळ विक्रेते ,रिक्षाचालक यांचा वेश धरण करून सापळा लावला. पिवळ्या रंगाचा टी शर्ट व जिन्स पॅंन्ट   घातलेला एक तरुण चाँदनी चौकात बसची वाट पाहत थांबला होता . त्याला पकडण्यासाठी   पोलिस गेले असता  त्याने तेथून पळ  काढला . त्याचवेळी पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.
             त्याच्याकडील राखाडी रंगाच्या सॅकमध्ये  मध्ये तीन गावठी कट्टे व बारा काडतुसे आढळून आली. सुमारे एक लाख १३ हजार किमतीचा हा ऐवज  पोलिसांनी जप्त केला आहे.
चार जिल्हे, २५  गुन्हे 
आरोपी सुयोग मच्छिंद्र प्रधान  हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पुणे, औरंगाबाद ,बीड व अहमदनगर या चार जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी असे विविध प्रकारचे २५  गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसानी दिली. बीड जिल्ह्यात २० , नगर जिल्ह्यात ३ , औरंगाबाद जिल्ह्यात २ पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसानी  सांगितले.