‘पदवीधर’ साठी सोमवारी मतदान

प्रशासनाची जय्यत तयारी; जिल्ह्यात १४७ केंद्र

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी(दि.३०) मतदान होत आहे. नगर, नाशिक ,धुले,जळगाव,नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा मतदारसंघात समावेश आहे. निवडणुकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे
या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष वेधले असून सत्यजित तांबे व शुभांगी . पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे . नगर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १५ हजार ६३८ ईतके मतदार असून नाशिक जिल्ह्यात ६९ हजार ६५२ मतदार आहेत. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात ३५ हजार ५८ मतदार असून धुळे  जिल्ह्यात  २३ हजार ४१२ टीआर नंदुरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ एतके मतदार आहेत. नगर जिल्ह्यात सर्वाधिक  मतदार असल्याने नगर जिल्हा किंगमेकर  ठरणार आहे.  सत्यजित तांबे हे नगर जिल्ह्यातील असून त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शुभांगी पाटील धुळे जिल्ह्यातील आहे
. नगर जिल्ह्यातील प्रा. सुभाष चिंधे हेही निवडणूक रिंगणात आहेत. शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचे भाजप वर्तुळात बोलले जात आहे. या निवडणुकीसाठी एकूण २ लाख ६२ हजार ७७१ मतदार आहेत.  त्यासाठी ३३८ मतदान केंद्र करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक १४७ मतदान केंद्र आहेत. यामध्ये आकोळे १०, संगमनेर २८, राहता १५, कोपरगाव ८, राहुरी १०, नेवसा १०, नगर शहर व तालुका १६, पाथरडी ७, शेवगव ६, परणेर ८, श्रीगोंदा ९, जरजत ६, जमखेड ५.