अहमदनगर – केडगाव येथील वैष्णवीनगर येथे छापा टाकून सुपारीपासून मावा बनविणारे मशीन व सुगंधी तंबाखू , असा चार लाखांचा मुद्देमाल गुरुवारी पोलिसांनी जप्त केला . कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी रात्री ही कारवाई केली . या कारवाईमुळे मावा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे .
मजनू रशीद शेख ( वय ३२ , रा . भाग्योदय मंगल कार्यालय , वैष्णवीनगर , केडगाव ) यास अटक करण्यात आली असून , सादिक रशीद शेख व अविनाश पवार हे दोघे फरार झाले आहेत . कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना केडगाव येथे सुपारीपासून मावा बनविला जात असल्याची माहिती मिळाली . त्यानुसार पोलीस पथकाने वैष्णवीनगर येथे छापा टाकून सुगंधी तंबाखू व सुपारीपासून मावा बनविणारे मशीन ताब्यात घेतले . एकूण ४ लाख २१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून , पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत . पथकात योगेश भिंगारदिवे , गणेश धोत्रे , योगेश कवाष्टे , नितीन शिंदे , सलीम शेख , संतोष गोमसाळे , राजू शेख , अभय कदम , दीपक रोहकले , अमोल गाढे , सोमनाथ राऊत , अतुल काजळे यांचा समावेश होता.