उद्यान विभाग प्रमुख मेहेर लहारे वर गुन्हा दाखल करा

अहमदनगर — उद्यान विभाग प्रमुख मेहेर लहारे यांनी केलेल्या घोटाळ्याबाबत शिवसेनेने आंदोलन करून त्यांच्या निलंबनाची कारवाई केली परंतु त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज अहमदनगर महानगरपालिकेत आयुक्त शंकर गोरे यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली यावेळी माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते युवासेनेचे विक्रम राठोड माजी महापौर अभिषेक कळमकर नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक परेश लोखंडे नगरसेवक योगीराज गाडे नगरसेवक दत्ता जाधव व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आयुक्तांनी योग्य ती चौकशी करून लवकरच गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले त्यानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या दालना बाहेर पडले