जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड

कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी जिल्हा तालिम संघाला सहकार्य राहणार -डॉ. सुजय विखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा तालिम संघ संलग्न जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड करण्यात आली. तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी मुळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते मुळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा तालिम संघाचे सचिव अ‍ॅड. धनंजय जाधव, खजिनदार पै. नाना डोंगरे, उपाध्यक्ष दत्तात्रय अडसुरे, पारनेर तालुकाध्यक्ष पै. युवराज पठारे, पै. विलास चव्हाण, जे.डी. शेख, पै. शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, पै. मोहन हिरणवाळे, श्रीरामपूर तालुका तालिम संघाचे अध्यक्ष दीपक डावखर, नितीन मोरे, नंदू रेपाळे, अमोल काळे, निखील झिंजुर्डे आदी तालिम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याला कुस्ती व पैलवानांचा मोठा वारसा आहे. कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी जिल्हा तालिम संघाला सहकार्य राहणार आहे. कुस्तीसह सर्व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. तर अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या कार्याचे कौतुक केले. पै. वैभव लांडगे यांनी कोरोनामुळे बंद पडलेल्या कुस्ती खेळाला चालना व प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर जिल्हा तालिम संघाने पुढाकार घेऊन कुस्ती स्पर्धा घेतल्या. जिल्ह्यातील कुस्ती खेळाचा वारसा पुढे चालविण्याच्या दृष्टीने जिल्हा तालिम संघ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.