जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडी शाळेला पालकांनी ठोकले टाळे

कर्जत (प्रतिनिधी):-कोरेगाव जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडीत अनेकदा मागणी करून ही शिक्षक मिळत नसल्याने आज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांंच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रजपूतवाडी शाळेला टाळे ठोकले.

            कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडी येथे पहिली ते चौथी या चार वर्गात ११० विद्यार्थी संख्या असून सध्या अवघे दोन शिक्षक गेली अकरा महिन्यापासून ही शाळा सांभाळत आहेत, या शाळेचे मुख्याध्यापक बापू खोमणे यांचे मे २०२१ रोजी कोरोनाने निधन झाल्या नंतर त्याच्या जागेवर इतर शिक्षक देण्यात आलेला नाही, ९१ पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेस चार शिक्षक आवश्यक असतात मात्र या शाळेत अनेक दिवसांपासून दोन शिक्षक कार्यरत आहेत याबाबत अनेकदा शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाला लेखी निवेदन देऊन शिक्षक मागणी केली आहे मात्र शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपुतवाडीच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धरमसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष शरद मनूसिंग परदेशी, करणसिंग परदेशी, अजयसिंग परदेशी, मनोजसिंग परदेशी, सतपाल परदेशी, अभिषेक परदेशी, धनसिंग परदेशी, बाबूसिंग परदेशी, सचिन परदेशी, किशोरसिंग परदेशी, हरीओम परदेशी, शुभम परदेशी, ज्ञानेश्वर परदेशी, अभयसिंग परदेशी, शिवाजी परदेशी, हर्षद परदेशी, हनुमान परदेशी, नामदेव कदम तसेच महिलांमध्ये श्यामलाबाई परदेशी, मिराबाई परदेशी, आरती परदेशी, सपना परदेशी, वर्षा परदेशी, रोहिणी परदेशी, चांदणी परदेशी, रेखा परदेशी, मोनाली परदेशी, सारिका परदेशी, या पालकांनी शाळेला टाळे ठोकले.