डॉक्टर पुत्राचा अपघाती मृत्यू
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या डॉक्टर पुत्राचा अपघाती मृत्यू झाला. अभिषेक अर्जुन शिरसाठ (वय 17 रा. विराज कॉलनी, तारकपूर) असे मयत मुलाचे आहे. शहरातील सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात हा अपघात घडला. या प्रकरणी डॉ. अर्जुन आनंदराव शिरसाठ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक हा सावेडी भागात मॉर्निंग वॉकला जात होता. तो नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता सावेडीतील कुष्ठधाम रस्त्यावरील सोनानगर चौकात गेला होता. त्यास चुकीच्या दिशेने येऊन समोरून जोराची धडक दिली. या अपघातानंतर दुचाकीस्वार पळून गेला. अभिषेक या अपघातात गंभीर जखमी होऊन मयत झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार गिरीगोसावी पुढील तपास करीत आहेत