तरुणीची गोदावरी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या .
नगर येथील मनमाड महामार्गावरील गोदावरी नदी वरील मोठ्या पुलावरून महाविद्यालयीन तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केली . हि घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली . पोलीस दलाचे कर्मचारी व मच्छीमारांनी सायंकाळी उशिरा पर्यंत तिचा शोध घेतला . पण मृतदेहाचा शोध घेण्यास त्यांना अपयश आले . मंगळवारी दुपारी तीन चा सुमारास या तरुणाने गोदावरी पुलावरून नदीत उडी घेतली होती . हि मुलगी उडी घेत असताना सर्पमित्र संदीप खिरे याने पहिले . त्याने या बाबत पोलिसांना कळवले . पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचा टीम ने घटना स्थळी धाव घेऊन नदीपात्रात पोलीस कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी खिरे यांनी या तरुणीचा शोध घेतला .