देवस्थानांची ५१३ एकर जमीन लाटली – नवाब मलिक

बीड  जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील देवस्थानांची ५१३ एकर  जमीन भाजप चा नेत्यांनी हडप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला . अष्टीतील तीन मुस्लिम देव स्थाने आणि सात हिंदू देवस्थानाचा ५१३ एकर जमिनीचा कागद पत्रात फेरफार करून त्यावर खासगी नाव चढवले . तसेच त्यांचे प्लॉटिंग करून हजारो कोटींचा घोटाळा झाला  . यात भाजप आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा नावाचा समावेश आहे असे मलिक म्हणाले .
राष्ट्रवादी बीड जिल्हाचे नेते राम खाडे यांनी या दहा देवस्थनांचा जमीन घोटाळा समोर आणल्याचा नवाब मलिक यांनी सांगितले . २०१७ ते २०२० दरम्यान या जमिनी हडप केल्या गेल्या ,गृह मंत्रयांकडे तक्रार केल्या नंतर  एसआयटी ने  दोन गुन्हे दाखल करून तपास  सुरु केला आहे . राम खाडे यांनी  गृह महसूल आणि ईडी कडे दहा प्रकरणाची तक्रार केली . मच्छिंद्र मल्टीस्टेट को ऑप . सोसायटी चा यात सहभाग आहे .  राज्यात वफ्फ  बोर्डाचा माध्यमातून ११ एफ आय आर दाखल झाले आहेत .  मंदिर आणि मस्जिदीचा जागेवर फेरफार करून खासगी नावे चढून पोल्टिंग करीत हि जमीन विकल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर नांदेड .औरंगाबाद , परभणी ,जालना , पुणे ,ठाणे आणि बीड जिल्ह्यात एफ आय आर दाखल केल्याचे त्यांनी सांगितले .