धर्मांध राजकारण करुन समाजाच्या विकासाचा घात करु पाहणार्‍या गुट्टलबाज सत्ता पेंढार्‍यांविरोधात डिच्चू कावा वापरण्याचे आवाहन

धर्मांध राजकारण करुन समाजाच्या विकासाचा घात करु पाहणार्‍या गुट्टलबाज सत्ता पेंढार्‍यांना निवडणुकीतील विजयापासून कायमचे दूर ठेवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्राचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुट्टलबाज सत्ता पेंढार्‍यांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी डिच्चू कावा तंत्राशिवाय दुसरा पर्याय नाही. स्वातंत्र्याच्या 75 वर्षे देशातील गुट्टलबाज सत्ता पेंढार्‍यांनी तमाम मतदारांची सतत फसवणूक केली. मोठ्या संख्येच्या मतदारांना भाडभ्रष्ट करून त्यांची मते लाटली. त्याशिवाय जात आणि धर्माच्या राजकारणात सर्रास वापर करण्यात आला. देशातील बहुसंख्य मतदार हे अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुबळे असल्यामुळे त्यांना गुट्टलबाज पुढार्‍यांच्या काव्याची कल्पना आली नाही. त्यातच देशातील सर्वच राजकीय पक्ष गुट्टलबाज पुढार्‍यांची मदत घेऊन आणि त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊन मतदारांची फसवणूक करून सत्ता काबीज करीत आले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
संपूर्ण देशात झोपडपट्ट्यासह गरिबी आणि बेकारी वाढली आहे. याला गुट्टलबाज पुढारी आणि त्यांचे राजकीय पक्ष जबाबदार आहेत. सत्तापेढार्‍यांनी राजकीय सत्तेच्या वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला आणि त्याच वेळी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत देशातील गरिबी आणि बेकारी हटली नाही. त्यामुळे तमाम मतदारांनी यापुढे जात, धर्म, पैसा किंवा कोंबडी आमिषांना बळी न पडता डिच्चू कावा तंत्राचा वापर करुन चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावे. तर गुट्टलबाज भाडभ्रष्ट उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
देशात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे मुळं निवडणुकांमध्ये आहे. मागच्या दाराने सत्ता मिळवणार्‍या सत्तापेंढार्‍यांना इंग्रज गेल्यानंतर मोठी संधी प्राप्त झाली. इंग्रजांनी केलेल्या लुटीच्या अनेकपटीने लुट सत्तापेंढार्‍यांनी केली आहे. जनता जागृक झाल्यास डिच्चू काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन-प्रशासनाची पुनरावृत्ती होणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.