भाडे न ठरवता घंटा गाड्या ठेकेदाराला सुपूर्द

महापालिकेने कचरा संकलनासाठी ठेकेदाराला भाडे तत्वावर वाहने दिली आहेत .परंतु या वाहनाचे भाडे अद्याप निश्चित करण्यात आले नसल्याचा  प्रकार उघडकीस आला आहे . तब्बल १४ वर्षांनंतर स्वछता विभागाने भाडे निश्चिताचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .

महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी खाजगी संस्थेची  नेमणूक केली आहे . ऑक्टोबर २०१९ मध्ये पुणे येथील स्वयंभू संस्थेला कचरा संकलनाचा ठेका दिला आहे , हे काम देताना महापालिका व स्वयंभू संस्थेचा करार झाला होता .  यामध्ये महापालिकेची वाहने भाडेतत्वावर घेणे ठेकेदारावर बंधनकारक राहील अशी एक अट  होती . महापालिकेने नवीन ६२ घंटा गाड्या खरेदी केल्या होत्या . नव्याने खरेदी केलेली ६२ वाहने ऑगस्ट २०२१ मध्ये भाडे तत्वावर दिली होती .  त्यावेळी भाडे निश्चित करणं अपेक्षित होत परंतु महापालिकेने भाडे निश्चित न करता ठेकेदाराला वाहने सुपूर्द केली . त्या नंतर भाडे निशिचीत करण्याची प्रक्रिया सुरु केली ,उप प्रादेशिक कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवण्यात आले . या कार्यालयाने एका वाहनाचे प्रति २४ हजार भाडे आकारावे असे सुचवले , मात्र हे भाडे ठेकेदाराने अमान्य केलं असून या रकमेतून वाहन चालकांचे वेतन वजा करावे अशी मागणी केली  त्यामुळे महापालिका व ठेकेदाराच्या नवा वाद निर्माण झाला आहे . त्यामुळे स्वच्छता विभागाने हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर केला आहे . स्थायी समिती यावर काय निर्णय घेते या वर सगळ्याचे लक्ष लागले आहे .