
१.६६ कोटींचा गैरव्यवहार? ग्रामस्थांचे अमरण उपोषण सुरु!#Breaking #MetroPortal #TransparencyDemand #NagarDewale
अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर थरार!
नागरदेवळे ग्रामपंचायतीत गॅस पाईपलाईन खोदाईनंतर नुकसान भरपाईत अपारदर्शक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप!
सागर खरपुडे, निखिल शेलार यांचा थेट आरोप –
“ग्रामसभेची परवानगी नसतानाही भरपाईची रक्कम वापरली!
कमी दर, बिनधास्त निर्णय, शेतकऱ्यांवर अन्याय!”
भारत पेट्रोलियमकडून मिळाले १ कोटी ६६ लाख ५० हजार रुपये!
पण…
ना ग्रामसभा
ना तांत्रिक मूल्यांकन
ना–हरकत दाखला नाही
बी-१ टेंडर मागील तारखांना?
ग्रामपंचायतीच्या खात्यावरून पैसे वळवण्याचा आरोप!
गंभीर आरोप –
तत्कालीन ग्रामसेवक मनिष लोखंडे यांचा अधिकारांचा गैरवापर
प्रशासक संजय बोबडे व ग्रामसेवक संजय नांगरे यांचे कथित संगनमत
माजी पदाधिकाऱ्यांसोबत बेकायदेशीर निर्णय
गावकरी उतरले रस्त्यावर – सुरू झाले अमरण उपोषण!
सागर खरपुडे, सुशिल कदम, निखिल शेलार, सागर चाबुकस्वार, मुकेश झोडगे यांचा निर्धार –
“चौकशी झालीच पाहिजे, जबाबदारांना शिक्षा झालीच पाहिजे!”
ग्रामस्थांची मागणी –
स्वतंत्र चौकशी समिती नेमावी!
भरपाईची रक्कम गावातील पायाभूत सुविधांसाठीच वापरावी!
गैरव्यवहार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी!
Metro Portal वरून सर्वाधिक चर्चेत!
पारदर्शक प्रशासनाची मागणी करणाऱ्या नव्या पिढीचा आवाज!
ही बातमी शेअर करा आणि गावच्या न्यायासाठी आवाज उठा!