हिवरे बाजारचे काम पाहून एकच शब्द – अभिमान!

📍 हिवरे बाजार | प्रतिनिधी

📍
 हिवरे बाजार | प्रतिनिधी
💚 १८७६ दुर्मिळ देशी वृक्षांची ऐतिहासिक लागवड!
🌱 पर्यावरण, परंपरा आणि प्रेरणेचा अनोखा संगम!


🎉 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती आणि अनेक ऐतिहासिक घटनांच्या स्मरणार्थ
मातृस्मृती वनमंदिरात वृक्षारोपण सोहळा थाटात पार पडला.

👑 प्रमुख उपस्थिती:
▪️ विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे – फणस वृक्षारोपण
▪️ आमदार काशिनाथ दाते – बेहडा वृक्षारोपण
▪️ सन्मानित पाहुणे – जि.प. सदस्य वसंतराव चेडे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, गावातील मान्यवर


🗣️ प्रा. राम शिंदे यांचे मनोगत –
हिवरे बाजार व राळेगणसिद्धी हे ग्रामीण विकासाचे मॉडेल आहेत.
पोपटराव पवार यांच्या कार्याने हे सिद्ध झाले आहे.
इतर गावांनी हा आदर्श अंगीकारावा!”


🌿 या उपक्रमात विशेष स्मरण –
📌 अहिल्यादेवी होळकर – ३०० वी जयंती
📌 संत ज्ञानेश्वर – ७२५ वा संजीवन समाधी महोत्सव
📌 संत तुकाराम – ३७५ वा वैकुंठगमन
📌 शिवराज्याभिषेक – ३५० वा वर्षपूर्ती
📌 अमृत महोत्सव – भारताचा प्रजासत्ताक दिन
📌 अहिल्यानगर जिल्ह्याचे ५१ शूर शहीद जवान


🪔 कार्यक्रमात फेटा बांधून प्रा. राम शिंदेंचा सत्कार
🎓 उपस्थित – सरपंच विमलताई ठाणगे, छबुराव ठाणगे, मंगेश ठाणगे (मेजर), राजू ठाणगे (मेजर) व असंख्य ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी


 

🌱 पद्मश्री पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून उभा राहतोय एक हरित इतिहास!
📢 हिवरे बाजारचे काम पाहून एकच शब्द – अभिमान!