निरोगी मन आणि शरीर, निष्कलंक चारित्र्य हीच अँड. डी डी घोरपडे यांच्या यशस्वी जीवनाची पुंजी – सबनीस

अहमदनगर (प्रतिनिधी) वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करताना कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे आणि श्रीगोंदा पंचायत समिती, सिद्धेश्वर शिक्षण संस्था, योग्य विद्याधाम या माध्यमातून भरीव असे समाजोपयोगी कार्य करणारे अँड. डी डी घोरपडे यांचे निरोगी मन आणि शरीर, निष्कलंक चारित्र्य हीच त्यांच्या यशस्वी जीवनाची पुंजी आहे असे गौरवोदगार  ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक समीक्षक विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी काढले.
        अँड डी डी घोरपडे यांच्या पंचाहत्तरी निमित्त सिटी लॉँन, वसंत टेकडी, नगर औरंगाबाद रोड येथे अमृत महोत्सवी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
आले.घोरपडे मामाच्या बुध्दी कौशल्य मुळे मा. कै.शंकरराव काळे साहेब   त्यांचा उलेख ब्रेन ऑफ श्रीगोंदा असा करत असत. अशी आठवण त्यांनी मामा संदर्भात संगीतली.
त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी त्यांचे अध्यात्मिक गुरु डोंगरगण येथील ज्ञानेश योग आश्रमाचे महंत, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे गाढे अभ्यासक, वेद शास्त्र संपन्न हरी भक्त पारायण जंगले शास्त्री महाराज हे आले होते. कार्यक्रमाच्या ते अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल चे अध्यक्ष अँड. साळुंके, आ.संग्राम जगताप, आ. निलेश लंके , जिल्हा सरकारी मुख्य वकील adv. सतिश पाटील, राजेंद्र दादा नागवडे,.आ.राहुल जगताप,  .मोहनराव वाबळे, मोहनराव देशमुख,  थोरात साहेब, बाबासाहेब गुंजाळ, संपतराव म्हस्के. नगर जिल्हा लेबर फेडरेशन चे विश्वस्त दादासाहेब जगताप, शिक्षणाधिकारी दिनकर टेमकर, शिवसेनेच्या नेत्या शुभांगी पाटील, शिक्षण सहायक थोरात, अविनाश शिंदे, दादाभाऊ चितळकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ह. भ. प. जंगले महाराज शास्त्री म्हणाले की , प्रत्येक व्यक्ती आपल्या हक्कांकरिता भांडत असतो. धावत असतो. पण जी यशस्वी माणसे असतात ती कधीही आपला हक्क मागत नाहीत. ज्याचे कर्तव्य अबाधित असते त्याचे हक्क त्याच्यापुढे आपोआप येऊन सिद्ध होत असतात. प्रतिष्ठा ही शुद्ध चारित्र्य आणि सदाचारावर अवलंबून असते . अँड. डी डी घोरपडे यांनी केलेलं कार्य साहित्य, शिक्षण, योगसाधना राजकरण , सहकार अशा विविध क्षेत्रात आहे ते त्यांनी या च पद्धतीने केल्याने ते यशस्वी ठरले त्यांची पंचात्तरी साजरी झाली आहे. त्यांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची शतकोत्तरी साजरी करण्याची संधी आपल्याला मिळो अशा शब्दात त्यांनी घोरपडे यांना शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली . उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर ऍड डी डी घोरपडे यांचे सपत्नीक पाद्यपूजन आणि औक्षण करण्यात आले. त्यानंतर  प्रा. गणेश भगत यांच्या गणराज प्रकाशन ने प्रकाशित डॉ. रेवणनाथ पवार संपादित अमृत साधना या घोरपडे यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच हजारोंचा जनसमुदाय सदर कार्यक्रमास उपस्थित होता. स्वागत प्रा. गणेश भगत यांनी केले  तर आभार अँड. अर्चना देशमुख  यांनी मानले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.रेवणनाथ पवार व प्रदीप जगदाळे यांनी केले.
घोरपडे यांच्या पंचाहत्तरी निमित्त त्यांच्या निवासस्थानासमोर प्रांगणात योग विद्याधाम च्या वतीने योगसाधना करण्यात आली. यावेळी शेकडो साधकांनी 75 सूर्यनमस्कार घालून घोरपडे यांना दीर्घायुष्य लाभो अशी कामना करण्यात आली. तर यावेळी केरळ येथील साधक देखील ऑनलाईन सहभागी झाले होते.