पंतप्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य मोफत वितरीत करण्याची मागणी.

कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे  आर्थिक संकटामुळे गरिबांना कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना प्रति सदस्य प्रतिमहा 5 किलो अन्नधान्य मोफत वितरित करण्याच्या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार दिव्यांगचे जिल्हाध्यक्ष अँड.लक्ष्मणराव पोकळे, शहराध्यक्ष विजय हजारे, सचिव हमीद शेख, जिल्हा संघटक राजेंद्र पोकळे, मधुकर घाडगे, लक्ष्मीबाई देशमुख, पोपट शेळके, किशोर सूर्यवंशी, संजय पुंड, दत्तात्रय महानोर, संदेश रपारीया आदी पदाधिकारी उपस्थित होते.                                      आपल्या जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना कार्डधारक लाभार्थ्यांना नियमित गहू, तांदूळ, धान्य पुरवठा करावा गेली दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक दुर्बल घटकांचे दिव्यांग विधवा महिला निराधार यांच्यासाठी प्रतिव्यक्ती 5 किलो धान्य पुरवठा केला जातो परंतु आपल्या जिल्ह्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदार या लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरित करता काळ्याबाजारात विक्री करतात अशा अनेक तक्रारी असून त्यामुळे अनेक लाभार्थी अंत्योदय अन्न सुरक्षा योजने पासून वंचित राहत आहे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी स्वतः धान्य दुकानदारांना या लाभार्थ्यांना अन्नधान्य पुरवठा व्यवस्थित वितरित करावा असे आदेश देण्यात यावेत व दिव्यांग महिलांना स्वस्त धान्य दुकानदारांच्या कुठल्याही रांगेत न उभा करता त्यांना तात्काळ मोफत धान्य पुरवठा करावा या अंत्योदय अन्न योजनेत शिधापत्रिकेवर एक सदस्य असल्यास 5 किलो व 2 सदस्य असल्यास 10 किलो या प्रमाणे अन्नधान्याचे वितरण करणे गरजेचे आहे. अनेक स्वस्त धान्य दुकानदार वेगवेगळी कारणे सांगून लाभार्थ्यांना पूर्ण धान्य देण्यास टाळाटाळ करतात आणि शासनाचे आदेश धुडकावून लावतात अशा मुजोर रेशन दुकानदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अथवा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलना कडे तक्रार करण्याची मागणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव पोकळे यांनी केले.