पाइप लाइन रोडवर एटीएम मशीन फोडले , सुदैवाने रोकड शाबूत .

सावेडी उपनगरात असलेल्या पाइप लाइन रोडवरील दोन बँकांचे एटीएम फोडून नेण्याचा प्रयत्न झाला , परंतु चोरट्याने यात यश आले नाही . बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन मशीन फोडण्याचा प्रयन्त चोरट्यांणी केला . विशेष म्हणजे या दोन्ही एटीएम मध्ये पैसे असून देखील ती चोरट्यांचा हाती लागली नाही .  या चोरीची माहिती मिळताच तोफखाना पोलीस .श्वान पथक , ठसे तज्ज्ञ यांचे पथक व बँकेचे अधिकारी घटना सिहाली हजार झाले . या प्रकरणी  सोमवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न , तोडफोड करणे या कायदा कालमानवये गुन्हा दाखल करण्यात आलं आहे . बँकेचे व्यवस्थापक विश्वास पोपट कसबे यांनी या संदर्भात ठाण्यात फिर्याद दिली आहे .
जिल्ह्यात एटीएम मशीन  फोडून रोकड चोरून नेण्याचे प्रकार सर्रास पने सुरु आहेत . सोमवारी पहाटे चोरटयांनी  बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन  एटीएम मशीन फोडण्याचा प्रयन्त गॅस कटरने करण्यात आला ,  हे मशीन फोडण्यापूर्वी चोरटयांनी एटीएम मधील सीसी टीव्ही कॅमेऱ्याला कलर स्प्रे मारला . परंतु एक आरोपी  सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले . ,
सोमवारी ग्राहक पैसे काढण्यासाठी आले तेव्हा त्यांना मशीन फोडल्याचे लक्षात आले ,त्यांनतर तोफखाना  पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती दिली गेली . नंतर पोलीस घटना स्थळी पोहोचले , या घटने चा अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत .