प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने पदभार स्विकारल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांचा सत्कार

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी गुरुवारी (दि.27 जानेवारी) पदभार घेतल्याबद्दल त्यांचा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. संदिप कोकरे, डॉ. मनोज घुगे, संजय ठोंबरे, डॉ. अरविंद सोनवणे, दिव्यांग मित्र राजेंद्र  पोकळे, संदीप खामकर, शंकर पानसरे, संदेश रपारिया,  विजय हजारे, पोपट शेळके आदी उपस्थित होते.
अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे अपंग बांधवांना नेहमीच सहकार्य मिळत असून, अपंगांसाठी उत्तमप्रकारे कार्य सुरु आहे. अपंगांचे प्रश्‍न सुटून त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी संघटना कार्यरत आहे. नुतन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून देखील अपंग बांधवांना सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी सत्काराला उत्तर देताना जिल्हा रुग्णालयात समाजातील गोर-गरीब घटक येत असतात. त्यांना दर्जेदार वैद्यकिय सुविधा मिळण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. अपंग बांधव आपल्याच समाजातील घटक असून, त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुर्णत: सहकार्य देण्याचे त्यांनी सांगितले.